आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मरण मार्टिन ल्यूथर किंगच्या स्वप्नाचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1963 मध्ये वॉशिंग्टनवर हजारो निदर्शकांनी कूच केली होती. त्या वेळी लिंकन मेमोरियलच्या पायर्‍यांवर उभा राहून मार्टिन ल्यूथर किंग, ज्यु. यांनी ‘माझे एक स्वप्न आहे..!’ हे अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे भाषण दिले होते. त्या ऐतिहासिक भाषणाला 28 ऑगस्ट रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या स्मृत्यर्थ हजारो निदर्शकांनी शनिवारी लिंकन मेमोरियलवर पुन्हा कूच केली.
किंग यांचे चिरंजीव मार्टिन ल्यूथर किंग तिसरे यांनी त्या ऐतिहासिक ठिकाणी उभे राहून भाषण दिले. ‘ही औदासीन्याने स्मरणोत्सव साजरा करण्याची वेळ नाही. त्यांचे कार्य अद्यापही अपूर्णच आहे. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. तो आपण गाठू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असे मार्टिन ल्यूथर किंग तिसरे म्हणाले.

माझे एक स्वप्न आहे..
माझे एक स्वप्न आहे..त्वचेच्या रंगावरून नव्हे तर चारित्र्यावरून माणसे ओळखली जातील, अशा देशात माझी चार मुले एक दिवस नक्कीच राहतील. -मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनियर

पुढील स्लाइडमध्ये, गांधीजींच्या नातवाचाही सहभाग