आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Martin Place Cafe Hostage Issue In Sidany Read More At Divya Marathi.com

सिडनी : मार्टिन प्लेस समोर असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात अनेक भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सिडनीमधील दहशतवाद्यांनी बंधक बनवलेल्या 40 नागरिकांच्या ओलिस नाट्यानंतर कॅफेच्या समोर असणारी अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पुण्यातील एका भारतीयाने दिली आहे.
सिडनीतील मार्टिन प्लेस येथील लिंड्ट कॅफे येथे ४० जणांना ओलीस ठेवण्यात आलेल्या कॅफेच्या समोरच समोरच या भारतीय व्यक्तीची आयटी कंपनी असल्याचे त्यांनी दिव्य मराठी डॉट कॉमला आज सकाळी (ता.15) सांगितले.
ते म्हणाले की, 60 मार्टिन प्लेस हा सिडनीतील परिसर व्यावसायाच्या दृष्टीने सर्वात गजबलेला भाग आहे. या भागात वेस्टपॅक बॅंक, रिझर्व्ह बॅंक ऑफ ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलियन ज्युडिशिअलची कार्यालये आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व इमारती लॉकडाऊन करण्यास सुरूवात केली आहे. तसेच आम्हाला देखील घरी सोडण्यात आले आहे.
ते म्हणाले की, डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणावर ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटक येत असतात. याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला असावा.
पुढील स्लाइडवर पाहा मार्टिन प्लेस समोरील नाताळची तयारी आणि मार्टिन प्लेस चौक...