आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maryam Like Bhutto, The Pakistani Voice For Women's Rights

पाकिस्‍तानच्‍या महिलांचा बुलंद आवाज; मरियम नवाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भारत दौ-याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जाहीरपणे म‍रियम नवाज यांनी आनंद व्यक्त केला होता. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे नाते नव्या आणि शांतीच्या दिशेने सुदृढ होण्याची आशा मरियम यांनी व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान भूतकाळातील घटनांमुळे एकमेकांना विरोध करत आहेत. दोन्ही देशांनी आपसातील वैर विसरून नव्याने सुरुवात करणे गरजेचे असल्याचे, मरियमने ट्विटरवर पोस्ट केले होते.
शरीफ यांनी भारत दौ-याला होकार देण्यामागे ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, त्यांच्यात शरीफ यांची मुलगी आणि पाकिस्तानच्या सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) या पक्षाच्या नेत्‍या मरियम नवाज शरीफ या पाकिस्‍तानच्‍या महिलांच्‍या हक्‍कासाठी लढत आहेत.

पाकिस्तानच्या राजकारणात मरियम यांना एक तरुण तडफदार नेत्या म्हणून ओळखले जाते. नवाज यांच्या पक्षानेच त्यांना एक वेगळी उंची मिळालेली असली तरी त्‍यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
पाकिस्‍तानच्‍या नावाजलेल्‍या महिला नेत्‍या बेनझीर भुत्तोसारखी लोकप्रियता मिळवणारी नवाज शरीफ यांची दुसरी मुलगी मरियम पाकिस्‍तानच्‍या राजकारणा सक्रिय आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा मरियम यांचा राजकीय प्रवास...