आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mass Hindu Wedding Ceremony At Karachi In Pakistan

PHOTOS: पाकिस्तानी हिंदू समाजातही सामूहिक विवाहाचे फॅड, कराचीत झाला सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या जोरदार गोळीबार सुरु आहे. यात भारत आणि पाकिस्तानच्या जवानांसह सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडत आहेत. गोळीबारामुळे सीमालगतच्या भागातील नागरिक स्थलांतरण करीत असले तरी दोन्ही देशांत मात्र शांतता नांदत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या 30 ते 40 लाख हिंदू समाजाचे नागरिक राहतात. त्यांच्यावर पाकिस्तानी संस्कृतीचा झालेला प्रभाव दिसून येतो. एवढेच नव्हे तर विवाहांवरही मुस्लिम संस्कृतीचा परिणाम दिसून येतो. त्याची झलक कराचीत झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात दिसून आली.
पाकिस्तान हिंदू काऊन्सिलच्या वतीने कराचीच्या आयएमसीए मैदानावर सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. पाकिस्तानमधील 50 जोडपी यावेळी विवाहबद्ध झाली. 2008 पासून काऊन्सिलच्या वतीने सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात.
पुढील स्लाईडवर बघा, पाकिस्तानमधील हिंदू विवाह सोहळ्याचे फोटो....
फोटो सौजन्य- रॉयटर्स, एएफपी, एपी, डॉन