आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायकेल जॅक्सनची जमीन गागा घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - पॉप स्टार लेडी गागाची नजर मायकेल जॅक्सनच्या जमिनीवर असल्याची माहिती हाती आली आहे. नेव्हरलँडमध्ये ही जमीन आहे. तेथे जॅक्सनच्या मालकीचे घरदेखील आहे. तिने अलीकडेच जॅक्सनच्या खासगी मौल्यवान वस्तू एका लिलावातून विकत घेतल्या होत्या. गागा एमजेची मोठी चाहती आहे. त्याचबरोबर एमजेची बहीण लाटोयाची चांगली मैत्रीणदेखील आहे. त्यामुळे नेव्हरलँडला मूळ स्थितीत ठेवण्याचे काम आपण करू शकतो, असे तिचे ठाम मत आहे.

लंडनला 2009 मध्ये गागाला जॅक्सनकडून पाठिंबा मिळाला होता. ही जमीन 3 हजार एकर परिसरात विस्तारलेली आहे. एमजेने 1988 मध्ये ही जमीन विकत घेतली होती. त्यात त्याने मालकीचा रेल्वे रूळ, प्राणिसंग्रहालयाची निर्मिती केली होती.