आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meat Of Tigers And Leopards In Russian Restaurant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: रशियाच्‍या रेस्‍तरॉंंत वाघ आणि बिबट्याच्‍या मांसाची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियाची राजधानी मॉस्‍कोमध्‍ये एका रेस्‍तरॉंंमध्‍ये वाघ आणि बि‍बट्याच्‍या मांसाची सर्रास विक्री होत असल्‍याचे उघडकीस आले आहे. या रेस्‍तरॉंंवर पोलिसांनी छापा मारल्‍यानंतर वाघ आणि बिबट्याचे मांस, कातडी आणि डोके मिळाले आहे.
(फोटो: रेस्टॉरंटमध्‍ये पोलिसांना मिळालेले प्राण्‍यांचे अवषेश )
रेस्‍तरॉंंमधून या मांसाची अवैध विक्री सुरु असून प्राण्‍यांचे काही अवयव पारंपारिक औषध निर्माण करण्‍यासाठी आशियाई बाजारपेठेत विकल्‍या जात असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.
‘तपास योग्‍य दिशेने सुरु असून पोलिस रेस्‍तरॉंंमधील व्हियतनामी कर्मचा-यांची कसून चौकशी करत आहेत. प्राण्‍यांची हत्‍या आणि तस्‍करीबाबतही खोलवर चौकशी सुरु आहे’, असे पोलिस प्रवक्‍त्‍यांनी सांगितले.
वाघाच्‍या मासाची किंमत 94 रुपये किलो आहे. तर डोक्‍याची किंमत दोन लाख रुपये असून वाघाच्‍या कातडीची किंमत सहा लाख रुपये आहे. रशियामध्‍ये एलीट वर्गातील वाघाचे मांस खुप लोकप्रिय आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा: रशियाच्‍या रेस्‍तरॉंंमध्‍ये पोलिसांच्‍या छाप्‍यात आढळेले जनावरांचे अवयव