आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेल्सन मंडेला यांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांनी बेजबाबदारपणा दाखवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांनी बेजबाबदारपणा केला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून मंगळवारी आगपाखड करण्यात आली.


दरम्यान, मंडेला यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांनी विचारविनिमय केला.
मंडेला यांचे खासगी जीवन आणि त्यांची प्रतिष्ठा या गोष्टींचा मीडियाने लिलाव मांडला आहे. मंडेला यांच्या प्रकृतीची माहिती मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मंडेला यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या, परंतु वैद्यकीय आचारसंहिता या गोष्टींना परवानगी देत नाही. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नात्याला तडा जाऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टरांएवढीच प्रसारमाध्यमांचीदेखील आहे.