आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीर हजर खान खोसो पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून मीर हजर खोसो यांची निवड झाली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून खोसो यांच्या नावाची रविवारी घोषणा करण्यात आली. बलुचिस्तानचे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती राहिलेले खोसो (84) मूळचे त्याच प्रांतातील जाफराबाद जिल्ह्यातील आहेत. देशातील संसद विसर्जित झाल्याच्या सहा दिवसांनंतरही संसदीय समिती आणि विरोधी पक्षाला विचारविनिमय करून कोणताही उमेदवार निश्चित करता आला नव्हता. त्यामुळे हा मुद्दा पाचसदस्यीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. शुक्रवार आणि शनिवारी आयोगाने चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय जाहीर झाला आहे. काळजीवाहू पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधील चार उमेदवारांत त्यांचे खोसो यांचे नाव होते. नासील अस्लम झाहीद, रसूल बक्ष पालेजो, इशरत हुसेन असे इतर उमेदवार होते.