आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK च्या मालकाला म्हणतो DADDY, या श्वानाच्या पेजला आहेत 19 लाख लाईक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही फेसबुकचे दिवाने असाल तर तुम्हाला फेसबुक पेजच्या लाईकची किंमत नक्कीच ठाऊक असेल. जर एखाद्या पब्लिक फिगर पेजला 1,917,340 लाईक्स असतील, तर तुम्हाला आपसुकच त्या व्यक्तीची लोकप्रियता लक्षात येईल. हो... ना... पण जर आम्ही सांगितले हे एवढे लाईक एखाद्या व्यक्तीच्या पेजला नसून हे एका श्वानाच्या पेजला आहेत, तर....

काय भूवया उंचावल्यात ना! मात्र हे खरं आहे. फेसबुकवर 'बीस्ट' नावाच्या या श्वानाच्या पेजला एकोणीस लाखांच्यावर लाईक्स आहेत. तसेच त्याच्या प्रत्येक फोटोला कमीत कमी 10,000 च्या वर लाईक्स आहेत. आहे की नाही गम्मत...

तुम्ही आम्ही इथे 100 लाईक्स मिळवण्यासाठी दिवसरात्र धडपडत असता. मात्र फार मुश्कीलीने (केवळ मुलांना) इथे 50 लाईक्स मिळतात. त्यामुळे तु्म्हा सर्वांना उत्सूकता लागलीच असेल की हा भाग्यवान श्वान आहे तरी कोण....

होय हा भाग्यवानच श्वान आहे... कारण हा श्वान कोणी साधा-सुधा रस्त्यावर फिरणारा श्वान नसून, तो फेसबुकचा जन्मदाता मार्क झुकरबर्गचा श्वान आहे. मार्क आणि त्याची गर्लफ्रेन्ड सिला 'बीस्ट' ला आपल्या मुलाप्रमाणे जपतात.

हंगेरियन शीपडॉग प्रजातीतील या श्वानाच्या पेजला अनेक सेलिब्रीटींनीसुध्दा लाईक केले आहे. हे पेज कोण अपडेट करते याबद्दल काही निश्चित सांगता येत नाही. कदाचित खुद्द पप्पा मार्क आणि मम्मी सिलाच हेच हे पेज अपडेट करत असतील. कारण या पेजवरील फोटोंमध्ये त्यांच्या अगदी खासगी फोटोंचाही समावेश आहे.

बीस्टच्या या पेजवरील फोटोंमध्ये त्याच्या बारीकसारीक सवईंना अत्यंत बारकाईने टीपण्यात आले आहे. यामध्ये मेंढ्यांच्या पाठीमागे धावताना, घरात एकांतवासात बसलेला, अंघोळ झाल्यानंतरचा, प्रवासाला जाताना, पप्पा मार्कसोबत फेसबुक हॅंडल करताना, तर मम्मी सिलासोबत डायनिंग टेबलवर लॅपटॉपशी खेळताना असे अनेक पैलू त्याच्या पेजवरील फोटोंतून दाखवण्यात आले आहेत.

मार्क आणि सिलाचा हा लाडका बीस्ट अनेकांचा लाडका बनू लागल्याचे या फॅनपेजच्या लाईक्स वरूनच कळून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या प्राण्याच्या पेजला लाईक मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल...

बीस्टच्या फेसबुक पेजला लाईक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

हाय I M Beast...
माझ्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.. बीस्ट facebook page

चला तर मग पाहूयात त्याच्या फेसबुक पेजवरील काही मजेदार फोटो...
divyamarathi.com तर्फे खास तुमच्यासाठी...

(फोटो- सर्व फोटो बीस्टच्या फेसबुकवॉलवरून घेण्यात आले आहेत)