ही तरुणी मॉडेल किंवा अभिनेत्री असेल, असे जर तुम्हाला वरील छायाचित्र पाहून वाटत असेल तर तुम्ही देखील तिच्या सौंदर्याला फसलात. या तरुणीला जगातील सर्वात सेक्सी क्रिमीनल म्हणून ओळखले जाते. तिचे नाव आहे स्टेफनीया बेयूडोइन. सध्या सोशल मीडियावर ती भलती चर्चेत आहे. 21 वर्षांच्या या तरुणीवर 114 गुन्हेगारी खटले सुरु आहेत. त्यात चोरीपासून अवैधरित्या शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.
स्टेफनीयाचा चोरी करण्याचा अंदाज निराळा आहे. गेल्या महिन्यात तिने 42 घरांमध्ये चोरी केली. यात तिच्या साथीला 13,14 आणि 17 वर्षांची तीन मुले होती. स्टेफनीया चालाखीने घराच्या मागच्या दारातून किंवा खिडकीतून घरात प्रवेश करते. या चोरीच्या आरोपात कॅनडामध्ये तिला अटक झाली होती.
स्टेफनिया सध्या नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. त्यासोबतच तिने चोरीचा धंदा सुरु केला आहे. चोरी करायची म्हणजे शस्त्रही सोबत असले पाहिजे. त्यासाठी तिने एक - दोन नाही तर, नऊ शस्त्र गोळा केली आहेत. पोलिसांनी तिच्या कारमधून ही शस्त्र जप्त केली आहेत.
स्टेफनियावर खटला सुरु असल्याने ती लाइमलाइटमध्ये आली आहे. तिचे वकील डेनिय यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की प्रत्येक चोरीच्या घटनेनंतर ती डॉक्टरांकडे जात होती आणि तिच्या मेंदूचे चेकअप करुन घेत होती. आता तिच्या पुढील भवितव्याचा निर्णय कोर्ट करणार आहे. नव्याने प्रसिद्धीस आलेल्या या तरुणीच्या
फेसबुक पेजला व्हिजीट केली तर 2,000 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.