आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mehar Tarar Sunanda Pushkar And Shashi Tharur Conflict On Twitter

पाकिस्‍तानी मेहर तरार आणि भारतीय थरूर यांचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानव संसाधन विकासमंत्री शशी थरूर यांची पत्‍नी सुनंदा पुष्‍कर व पाकिस्‍तानी महिला पत्रकार मेहर तरार या ट्विटरमुळे वादाच्‍या भोव-यात आडकल्‍या आहेत.

हा वाद शशी थरूर यांच्‍या ट्विटमुळे झाला आहे. पाकिस्‍तानी पत्रकार मेहर तरार व शशी थरूर यांच्‍यातील अफेअरची चर्चा ट्विटरवर सुरू झाली. शशी थरूर ट्विटरवर सर्वात जास्‍त प्रसिध्‍द असून त्‍यांच्‍या फॉलोवरची संख्‍या 20 लाखांच्‍या घरात आहे. यामुळे थरूर यांच्‍या ट्विट्सची चर्चा अगदी वा-यासारखी पसरली.

मेहर तरार या माझ्या पतीच्‍या मागे लागल्‍या असून तरार या आयएसआयच्‍या एजंट असल्‍याचा आरोप सुनंदा पुष्‍कर यांनी केला आहे.

या आरोपाबद्दल पत्रकार तरार यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून हे आरोप फेटाळले आहेत. तरार म्‍हणाल्‍या, सुनंदा पुष्‍कर यांनी माझ्यावर केलेले अरोप, हा वेडेपणाचा प्रकार आहे.

मेहर तरार या पा‍किस्‍तानी पत्रकार आहेत. 2 मार्च 1968 मध्‍ये पाकिस्‍तानच्‍या लाहोर शहरात मेहर यांचा जन्‍म झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण या शहरातील प्रेझेंटशन कॉलेजात झाले. त्‍यानंतर लाहोरच्‍या किनॅड कॉलेजमध्‍ये इंग्लिश लिट्रेचरमध्‍ये एम.ए. झाले. सध्‍या मेहर तरार या टाइम्‍स या दैनिकामध्‍ये संपादिका म्‍हणून काम करत आहेत.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा मेहर तरार यांची छायाचित्रे.........