आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहर स्कँडलला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दाबले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी प्रसारमाध्यमात सुनंदा पुष्कर प्रकरणाचे वृत्त आले आहे, परंतु शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यात ट्विट्सला जास्त महत्त्व दिले नाही. सुनंदाच्या मृत्यूची बातमी अगदी ड्राय स्वरूपात देण्यात आली आहे, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मीडियाने मात्र सुनंदाचा मृत्यू, ट्विट प्रकरणास उत्तरीय तपासणी अहवाल जोडण्याचा प्रयत्न केला. जाणून घ्या... पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय मीडियातील सुनंदाच्या मृत्यूच्या बातम्या.
द डॉन । मुलगा म्हणतो, कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा
थरूर यांचा मुलगा आणि टाइम मॅगझीनचा पत्रकार इशान यांच्या हवाल्याने वृत्त देण्यात आले. आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर ठेवा. ‘डॉन’ने सुनंदा मृत्यूच्या प्रत्येक पैलूस मांडण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्राने त्यावर कसलीही टिप्पणी केली नाही. शशी थरूर यांच्या स्वीय सहायकाच्या हवाल्याने ही माहिती दिली.
पाकिस्तान टुडे । थरूर रुग्णालयात
भारतीय केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनंदा यांचा मृत्यू एका लक्झरी हॉटेलमध्ये झाला. शनिवारी त्यांचे पोस्टमॉर्टेम झाले. वृत्तपत्राने सुनंदा यांचा मृत्यू आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार, शशी यांचे ट्विट याला जोडून विश्लेषण केले आहे. तिघांचेही ट्विट प्रकाशित केले आहेत. थरूर दांपत्य ट्विटर वादामुळे दु:खी होते, असे सांगण्यात आले.
द एक्स्प्रेस ट्रिब्यून । शशी थरूर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता
सुनंदा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘आत्महत्येची शक्यता’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. घटस्फोटाच्या वृत्ताबद्दलही त्यात माहिती आहे. शशी यांच्यावर विवाहबाह्य संबंधाचा आरोपही सुनंदा यांनी केल्याचे वृत्तात म्हटले आहे.
द न्यूज इंटरनॅशनल । सुनंदाचा अनैसर्गिक मृत्यू
वृत्तपत्राने सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला अनैसर्गिक मृत्यू म्हटले आहे. शशी यांच्यावर सुनंदा यांनी आरोप केल्याचाही उल्लेख आहे. सुनंदा यांची उत्तरीय तपासणी शनिवारी झाली. पोस्टमॉर्टेम करणारे डॉ. सुधीर गुप्ता यांच्या हवाल्याने पुष्कर यांच्या मृत्यूचे कारण दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल, असे म्हटले आहे.
इतर देशांतील मीडिया
द टेलिग्राफ । थरूर यांचे अफेअर
सुनंदा पुष्कर यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याअगोदर सुनंदा यांनी पती शशी थरूर आणि मेहर तरार यांच्यातील प्रेमसंबंध चव्हाट्यावर आणले होते. मेहर यांच्याकडून प्रेमाची कबुली देणारे ट्विटदेखील वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.
न्यूयॉर्क डेली न्यूज । अनैसर्गिक मृत्यू
वृत्तपत्राने शशी थरूर आणि मेहर तरार यांच्या प्रेमसंबंधाला चांगले स्थान दिले आहे. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. मृत्यू अचानक झालेला नाही. शरीरावर खुणा सापडल्या आहेत. शशी, मेहर आणि सुनंदा प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे.
ग्लोबल टाइम्स । मृत्यू नैसर्गिक नाही
पत्नी सुनंदा यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस सुनंदा यांच्या मृत्यूचा तपास करत आहेत. पोस्टमॉर्टेममध्ये मृत्यू नैसर्गिक नसल्याचे म्हटले आहे. वृत्तपत्राने शशी-सुनंदा यांच्यावर सविस्तर माहिती दिली आहे.