आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगपती इजाजला व्हिसा 24 तारखेला पाकला जाणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - मेमोगेट प्रकरणातील कळीचा नारद ठरलेला अमेरिकास्थित उद्योगपती मन्सूर इजाज याला पाकिस्तानचा व्हिसा मिळाला असून येत्या 24 तारखेला तो चौकशी आयोगासमोर हजर राहू शकतो. बहुतांश वास्तव्य युरोपात करणाºया इजाजला स्वित्झर्लमधील पाकिस्तानी वकिलातीतने व्हिसा जारी केला आहे.येत्या 24 तारखेला तो सर्वोच्च न्यायालयाने मेमोगेट प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगासमोर हजर राहणार आहे. लंडनहून तो खास विमानाने रावळपिंडीला जाणार आहे.रावळपिंडीच्या चकाला विमानतळावर तो उतरेल.असे वृत्त टीव्ही वाहिन्यांनी दिले आहे.
उचलबांगडीला लोधीचे आव्हान
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालीद नईम लोधी यांनी आपल्या संरक्षण सचिवपदावरून झालेल्या उचलबांगडीला न्यायालयात आव्हान दिले आहे. लष्करप्रमुख जनरल कयानी यांचे निकटवर्तीय असलेल्या लोधी यांची पंतप्रधान गिलानी यांनी गेल्या आठवड्यात संरक्षण सचिव पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली होती. त्याला लोधी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष झरदारी,गिलानी यांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच पुढील सुनावणी फ्रेब्रुवारीच्या पुढील आठवड्यात ठेवली आहे.