आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सिंहिणींच्या पिंजऱ्यात उडी मारूनसुध्दा वाचला जीव, मनुष्याला खेळणे समजल्या सिंहिणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलोना - दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी वाघाच्या पिंजऱ्यात पडलेल्या तरूणाला काही क्षणातच वाघाने ठार केले होते. तो तरूण रडत होता. त्याच्यासमोर जीवाची भीक मागत होता. मात्र स्पेनमध्ये अगदी तसेच एक प्रकरण दिसून आले आहे. परंतु इथे थोडेसे उलटे आहे. स्पेनच्या बार्सिलोना शहरातील एका प्राणी संग्रहालयात एक व्यक्तीने सिंहिणींच्या पिंजऱ्यात उडी घेतली. पण त्याचा जीव वाचला. मात्र त्याने असे का केले याचे कारण अद्याप समजले नाही.
असे म्हणतात की, लष्कराचा गणवेश घातलेल्या या 45 वर्षीय जस्टो जोसने सिंहिणींच्या पिंजऱ्याच्या रेलिंगवर चढून आत उडी घेतली. तेथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांना हे पाहून धक्काच बसला. प्रत्यक्षदर्शींना हा व्यक्ती वाचणारच नाही असे वाटायला लागले. मात्र सिंहिणींनी त्याला केवळ जखमीच केले. या पिंजऱ्यात तीन सिंहिणी होत्या. सिंहिणींना ही व्यक्ती एखादी खेळणे असेल असेच वाटले. सिंहिणी त्याच्यासोबत जवळपास अर्धातास खेळत होते. या दरम्यान सिंहिणी जेस्टोला गुहेतही घेऊन गेल्या होत्या.
जेस्टोने जशी रेलिंगवरून आत उडी घेतली, तेव्हा लगेचच एका सिंहिणीने त्याची बॅग घेतली. तर दुसरी सिंहिण त्याला खेळणे समजून त्याच्याशी खेळायला लागली. त्याला ओढत गुहेमध्ये घेऊन गेली. त्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांनी सिंहिणींवर पाण्याचा फवारा मारला आणि जेस्टोला वाचवले. जेस्टोची प्रकृती सध्या गंभीर आहे. मात्र तो आता संकटातून बाहेर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जस्टो 13 वर्षांपर्यंत सिव्हील गार्ड होते. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच त्यांनी सुट्टा घेतल्या. त्यांच्या एका स्थानिक पार्टनरने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी जेस्टोचे त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता, यामध्ये त्यांच्याकडून त्यांची मुलेही हिरावून घेण्यात आली होती.

पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेची इतर छायाचित्रे...