आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाचा मामला : पुरुषांना 43व्या वर्षी येते मॅच्युरिटी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पुरुषांना फारशी परिपक्वता नसते, अशी एक तक्रार महिला वर्गाकडून केली जाते. त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. 42 वर्षांपर्यंत ते अपरिपक्व असतात, असा दावा यातून करण्यात आला आहे.

पुरुषांच्या पूर्ण परिपक्वतेचे वय 43 वर्षे असते, असा दावा ब्रिटनच्या संशोधकांकडून करण्यात आला आहे. याचा दुसरा अर्थ पुरुषांमध्ये येणारी परिपक्वता ही महिलांच्या तुलनेने अकरा वर्षांनंतर येते, असा होतो. महिलांमध्ये 32 व्या वर्षी परिपक्वता येते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. पुरुषांना अपरिपक्व ठरवण्यासाठी महिलांकडे अनेक कारणे आहेत.

महिलांची अशी धारणा असते. स्त्री-पुरुष संबंधात परिपक्वता येऊ लागल्याची जाणीव महिलांना अधिक होत असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.ज्या पुरूषांचे कपडे अजुनही आई धुते किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याचे कामही स्त्रियांकडे आहे. अशा पुरुषांचा समावेश अपरिपक्वतेमध्ये करण्यात आला आहे. निकलोडोन संस्थेकडून ही पाहणी करण्यात आली आहे.

घरगुती निर्णयप्रक्रिया महिलांकडे- घरगुती पातळीवर महिला-पुरुषांमध्ये अधिक जबाबदारपणे वागण्याची सवय महिलांना असते. त्याच निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका वठवतात. किंबहुना महत्त्वाचे अनेक निर्णय त्याच घेतात, अशी प्रत्येक चारपैकी एका महिलेची धारणा असते.

पुरुष तर बालिश!- पुरुष आपल्यातील बालिशपणा सोडत नाहीत, असे महिलांना वाटते. अनेक पुरुष व्हिडिओ खेळण्यात काहीच गैर मानत नाहीत. या शिवाय त्यांच्या खाण्याच्या सवयी देखील विचित्र असतात. अगदी सकाळी फास्ट फूड खाण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही, अशा महिलांच्या तक्रारी आहेत.

काय आहेत पुरुषांच्या अपरिपक्वतेची लक्षणे?- भांडण केल्यानंतर शांत राहण्याची सवय, वाहतुकीत इतर कारशी स्पर्धा करणे, साधा स्वयंपाक न जमणे, उद्धट शब्दांवर खिदळून हसणे, काटरून पायजमा परिधान करणे, काटरून असलेली चादर वापरणे.