आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक प्रोफाइलवरून मानसिक स्थितीचा अंदाज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंग्टन - सोशल नेटवर्किंग साइटवर असलेले प्रोफाइल म्हणजे केवळ वैयक्तिक माहितीपुरते मर्यादित नसते. त्यातून युजरच्या मानसिकतेचा अंदाज काढता येऊ शकतो. फेसबुकबाबत करण्यात आलेल्या पाहणीनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


युजरचे मानसिक आरोग्य कसे आहे, याचा वेधही प्रोफाइलमधून घेता येऊ शकतो. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातील बदल किंवा स्वभावाला जवळून तपासण्यासाठी फेसबुकवरील प्रोफाइल मानसोपचार तज्ज्ञांसाठी एक प्रभावी साधन ठरू शकते, असे संशोधक एलिझाबेथ मार्टिन यांनी सांगितले.