आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रकाराची ध्‍यानासाठी आगळी-वेगळी पध्‍दत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्यानधारणा करण्याच्या अनेक पद्धती असतात. पण एखाद्या चित्रकलेद्वारे ध्यानधारणा करण्याची पद्धत आजवर कुणी वापरली नसावी. नेदरलँडमधील जॉन फ्रेंजन हे कलाकार तणाव दूर करण्यासाठी तसेच नेहमी ताजेतवाने राहण्यासाठी एका श्वासात पानाच्या डावीकडून उजवीकडे सरळ रेष मारतात. त्यानंतर त्या रेषेला समांतर अशी दुसरी रेषा आखतात. खूप वेळ ही मालिका सुरू राहते आणि अखेरीस एक सुंदर कलाकृती बनते. ध्यानधारणेच्या या नव्या पद्धतीचे नाव मॉर्फोजेनेटिक फ्रीहँड ड्रॉइंग असे आहे. श्वास घेऊन रेखाटलेल्या या चित्रमालिकेला त्यांनी ‘इच लाइन वन ब्रेथ’ असे नाव दिले आहे. यात ध्वनी, प्रकाशांच्या लहरी तसेच मातीवरील रेघोट्यांचे आकारही दिसून येतात. त्यांच्या वेबसाइटवर हे चित्र पाहता येतील. संगणकावर दिसणा-या ध्वनिलहरींप्रमाणेच त्यांचे चित्र असते. हे त्यांनीच काढलेले चित्र असल्याचे पटवून देण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर ध्यानधारणा करण्याच्या आगळ्या पद्धतीचा व्हिडिओ इंटरनेटवर टाकला आहे. सूक्ष्म व बारकाईने केलेल्या या ध्यानाद्वारे मन:शांती मिळते. कारण प्रत्येक रेषा सरळ आखता येत नाही. त्यामुळे प्रत्येक श्वासानुसार नवा पॅटर्न तयार होतो. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी संयम आणि अभ्यास आवश्यक असतो.
thisisvolossal.com