न्यूयॉर्क - अमेरिकेत रेल्वे रुळात अडकलेली कार आणि मेट्रो रेल्वेची धडक होऊन झालेल्या अपघातात सहा ठार, तर १२ जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता न्यूयॉर्कच्या उपनगरात ही दुर्घटना घडली. बर्फवृष्टीमुळे रूळ दिसत नव्हते. क्राॅसिंगचा दरवाजा बंद होता. त्यामुळे एक कार रुळात अडकली. कारचालक कारला पाहण्यासाठी बाहेर पडली तेव्हा रेल्वे आली. धडक बसल्यानंतर रेल्वेने कारला फरपटत नेले. पुढील भागात आग लागली होती.