आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएच 370 विमानाचे संशोधकांना खूप कमी धागेदोरे मिळाले, संदेशाच्या ठिकाणचा तपास बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - तीन महिन्यांपासून बेपत्ता झालेल्या मलेशिया विमानाचा ढिगारा समुद्रात संदेश प्राप्त झालेल्या ठिकाणांवर मिळाला नाही. विमानाच्या तपासात सहभागी ऑस्ट्रेलियाच्या अधिकार्‍याने हा दावा केला आहे.
विमानाच्या तपासकामात खूप कमी धागेदोरे मिळाले आहेत. यामुळे विमान ठरलेल्या मार्गावरून जाणूनबुजून दूर नेण्यात आल्याचे संकेत मिळतात. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनार्‍यापासून जवळ 1600 कि.मी. अंतरावर काही संदेश प्राप्त झाले होते. यानंतर तपासाची कक्षा र्मयादित ठेवत संदेश मिळालेल्या ठिकाणांजवळ शोध घेण्यात आला होता. संदेश बेपत्ता विमानातील ब्लॅक बॉक्सचे असल्याचे मानण्यात आले. मात्र, ही शक्यताही खोटी ठरली. यानंतर ऑस्ट्रेलिया वाहतूक सुरक्षा विभागाने विमानाच्या ढिगार्‍याचा तपास बंद करण्याचा सल्ला दिला होता.

विमान आठ मार्च पासून बेपत्ताच
मलेशियन विमान एमएच 370 आठ मार्च रोजी क्वालालंपूरहून बीजिंगसाठी रवाना झाले. मात्र, काही वेळानंतर विमान रडारवरून बेपत्ता झाले होते.