आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mh370 Australian Pm Very Confident Signals Are From Malaysian Jet Black Boxes

'ते' संकेत 'MH370'च्या ब्लॅक बॉक्सचेच; ऑस्ट्रेलियाच्या शोधकर्त्यांना विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- गेल्या महिन्यापासून बेपत्ता मलेशियन विमान सापडण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने सुरु केलेल्या शोधमोहिमेत दक्षिण हिंदी महासागरातून आज (शुक्रवार) पुन्हा नवीन संकेत मिळाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महासागराच्या पाण्यातून मिळत असलेले संकेत हे मलेशियन विमान 'MH370'च्या ब्लॅक बॉक्सचेच असल्याचे विश्वास शोधकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मंत्री टोनी एबॉट यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील वेळी ज्या ठिकाणाहून ध्वनी संकेत मिळाले, त्याच ठिकाणाहून आजही संकेेत मिळाले. हे संकेत बेपत्ता मलेशियन विमान MH 370 च्या ब्लॅक बॉक्सद्वारेच देण्यात आलेले असावेत, अशी शक्यता यापूर्वी वर्तवण्यात आली होती.

या ध्वनी रूपातील संकेतांचे विश्लेषण करण्यासाठी काही तास लागतील, मात्र एखाद्या मानव निर्मित स्रोताकडूनच हे संकेत पाठवलेले असावेत, अशी माहिती शोधमोहिमेचे संयुक्त समन्वयक अँगस ह्युस्टन यांनी दिली आहे.