आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MH370 Malaysian Plane News In Marathi, Aviation,

MH370 कझाकस्तान किंवा भारतीय महासागराकडे गेले असावे -मलेशिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटल्यानंतर MH370 हे बेपत्ता झालेले विमान तब्बल सहा तास उड्डाण करीत होते. सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हे विमान कझाकस्तान किंवा भारतीय महासागराकडे गेले असावे, अशी माहिती मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी आज (शनिवार) दिली.
क्वालालंपूर येथून बीजिंगच्या दिशेने जात असलेले विमान मलेशियाजवळ असलेल्या समुद्रात कोसळले असावे, या तर्काला मलेशियाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीने पूर्णविराम मिळाला आहे. विमानातील वैमानिक, क्रू कर्मचारी आणि प्रवाशांसंदर्भात अधिक माहिती मिळविण्यात येत असून विमानाचे अपहरण झाल्याची शक्यता अद्याप नाकारण्यात आलेली नाही.
शासकीय वृत्तवाहिनीवर थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले, की बेपत्ता विमानासाठी उघडण्यात आलेल्या शोध मोहिमेला एक नवीन वळण लागले आहे. वैमानिकाने निर्धारित मार्गापासून विमान दूर का नेले, याबाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे. वैमानिकाने मार्गात बदल केला असला तरी विमानाचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता कमीच आहे. विमानाचे अपहरण झाले असते तर अपहरणकर्त्यांनी काही मागण्या पुढे ठेवल्या असत्या. एवढेच नव्हे तर विमानाचे अपहरण करण्यामागचे काही कारणही दिसून येत नाहीये.