आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MH370, Malaysian Plane News In Marathi, Aviation

MH370 संदर्भात उघडकीस आलेल्या महत्त्वपूर्ण बाबी, राहिलेली रहस्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- मलेशियाचे बेपत्ता विमान MH370 हिंदी महासागरात कोसळले असून त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, अशी घोषणा मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी केली आहे. परंतु, विमानासंदर्भातील अनेक रहस्यांवरून पडदा अद्याप उठलेला नाही. ही रहस्ये कायमस्वरूपी रहस्येच राहणार काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
बेपत्ता विमानासंदर्भात उघडकीस आलेल्या बाबी-
विमान कोसळले- दक्षिणेकडील हिंदी महासागरात विमान कोसळले, अशी माहिती नजीब यांनी दिली आहे. विमान उतरविण्यासाठी असलेल्या संभाव्य ठिकाणांपासून दूरवर विमान समुद्रात कोसळल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शेवटची स्थिती- ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरापासून पश्चिमेकडे असलेल्या समुद्रातील मध्यभागी विमान कोसळले असावे, असे एका ब्रिटिश कंपनीने सांगितले आहे. नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासात कधीही वापरण्यात न आलेल्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून विमानाच्या अंतिम ठिकाणाची माहिती मिळविण्यात आली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सॅटेलाईट्सनी आणि रडारनी दिलेल्या माहितीचाही अभ्यास करण्यात आला आहे.
कुणीच बचावले नाही- विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवासी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत, असे नजीब यांनी सांगितले आहे. या विमानात एकूण 239 जण होते.
या रहस्यांवरून पडदा उठलेला नाही
कोण आणि कसे- विमानासोबत काय झाले यासंदर्भात मलेशियाच्या प्रशासनाने अद्याप विश्वासार्ह माहिती दिलेली नाही. विमान मुद्दाम मलेशियातून मलाक्काच्या खाडीत नेण्यात आले होते. त्यातील संदेशवहनाची यंत्रणा बंद करण्यात आली होती, एवढीच माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर काय झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. यासंदर्भात दहशतवादी हल्ला, विमानाला नुकसान पोहोचणे, इमजन्सी परिस्थितीत विमानाची उपकरणे काम न करणे, वैमानिकाची मानसिक अवस्था किंवा विमानात असलेल्या काही बाबी अशी भलीमोठी यादी देण्यात आली आहे.
समुद्रावर तरंगतेय तरी काय? ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या सॅटेलाईट्ना समुद्रावर आढळून आलेले संभाव्य अवशेष विमानाचे होते, की इतर कशाचे होते, याची माहिती मलेशियाकडून देण्यात आलेली नाही. मलेशिया बेपत्ता विमानाची संपूर्ण माहिती देत नसल्याचा आरोप, आधीच भारताने केला आहे.
या विमानासाठी सुमारे 25 देशांकडून राबविण्यात येत असलेली शोध मोहिम मागे घेण्यात आली आहे. आता ही रहस्ये रहस्येच राहतील काय, अशी विचारणा करण्यात येत आहे.