आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MH370 News In Marathi, Hollywood Working On Multiple Movies, Malaysia Airlines Tragedy

MH370 क्रॅश होण्यापूर्वी झेपावत होते प्रचंड वेगात; हॉलिवूडमध्ये दुर्घटनेवर बनणार सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता झालेल्या MH370 विमानाची शोध मोहिम ऑस्ट्रेलिया सरकारने पुन्हा उघडली आहे. कथित MH370 विमान निर्धारित करणार्‍या आलेल्या वेगापेक्षा प्रचंड वेगाने झेपावत होते, अशी माहिती चौकशीअंती समोर आली आहे. विशेष म्हणजे विमानाचा वेग प्रचंड असल्याने इंजिन जास्तप्रमाणात इंधन खर्च करत होते.

ऑस्ट्रेलियन मॅरीटाइम सेफ्टी ऑथरिटीने (एएमएसए) सांगितले, की दक्षिण चीन समुद्र आणि मलक्काच्या खाडीदरम्यात MH370 झेपावत असताना त्याचा वेग प्रचंड असल्याचे रडारवरील माहितीच्या अाधारे स्पष्ट झाले आहे. एएमएसएनुसार, प्रचंड वेगामुळे विमानाचे जास्त इंधन खर्च झाले होते. त्यामुळे कथित विमान हिंदी महासागरात जास्त दूर पोहोचण्याची शक्यता तशी कमी असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

एएमएसए इमरजेंन्सी रिस्पॉन्स डिव्हिजनचे जनरल मॅनेजर जॉन यंग यांनी सां‍गितले, की सुरुवातीला 3000 किलोमीटर परिसरात शोध मोहिम सुरु करण्यात आली होती. परंतु, प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पर्थपासून 1100 किमी अंतरापर्यंत शोध मोहिम राबविली जात आहे. तर, मिळालेली माहिती ही अधिकृत असून 319000 वर्ग किलोमिटर परिसरात शोध घेतला जात असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉटने सांगितले आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दक्षिण हिंदी महासागरात मलेशियन विमानाच्या अवशेषांचा शोध घेत असताना हॉलिवूडमध्ये MH370 विमानाच्या रहस्यमय बेपत्ता होण्याच्या घटनेवर सिनेमा तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रोजेक्टसाठी कोणताही स्टुडिओ अद्याप तयार झाला नसला तरी इंडस्ट्रीत यावर सिनेमा निर्मितीबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, हॉलिवूडमधील चर्चा...