आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब हवामानामुळे MH370 ची शोध मोहिम तुर्त स्थगित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ (ऑस्ट्रेलिया)- खराब हवामानामुळे मलेशियाचे बेपत्ता विमान MH370 साठी उघडण्यात आलेली शोध मोहिम आज (गुरुवार) दिवसभरासाठी रद्द करण्यात आली. उद्या हवामान अनुकूल राहिल्यास पुन्हा शोध मोहिम सुरू केली जाणार आहे. सॅटेलाईटसच्या छायाचित्रांमध्ये काल बेपत्ता विमानाचे 122 संभाव्य अवशेष दिसून आले होते. 11 लष्करी विमाने आणि पाच जहाजांच्या मदतीने हिंदी महासागरातील दूरवरच्या परिसरात त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मरिटाईम सेफ्टी अथॉरिटीने सांगितले, की सॅटेलाईटच्या छायाचित्रांमध्ये संभाव्य अवशेष दिसून आलेल्या ठिकाणाकडे जात असलेली लष्करी विमाने आणि जहाजे परत पर्थच्या दिशेने येत आहेत. खराब हवामानामुळे आजची शोध मोहिम गुंडाळण्यात आली आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे, कमी उंचीवर आलेले ढग आणि दृष्यतेत कमालिची घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदी महासागरातील दूरवरच्या भागात 122 संभाव्य अवशेष आढळून आल्याने मलेशिया आणि चीनमधील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. बेपत्ता विमानाचा अपघात झाला असून सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य ठार झाल्याचे मलेशिया सरकारने जाहीर केल्यावर चौफेर टीका करण्यात आली होती.
पुढील स्लाईडवर वाचा, चीनमधील टीव्ही अॅंकर म्हणाली, मलेशियाला जाणार नाही...