आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलेशियन विमान, वैमानिक मुख्य संशयित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - मलेशियाचे गायब झालेल्या विमानाचे रहस्य शोधण्यासाठी तपास यंत्रणेने आपल्या तपासाचे लक्ष आता वैमानिकावर केंद्रित केले आहे. एमएच-370 विमानाचा वैमानिक घटनेतील मुख्य संशयित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे घटनेचा फौजदारी तपास होण्याची शक्यता फेटाळण्यात आलेली नाही. मलेशियाच्या विशेष शाखेकडून या तपासाचे संकेत देण्यात आले आहेत. 8 मार्च रोजी बीजिंगकडे जाणारे हे विमान गायब झाले होते. विमान इतिहासातील अशा प्रकारची पहिलीच घटना असून विमानातून 239 जण जात होते. या विमानाच्या शोधासाठी जगातील अर्ध्याअधिक देशाची यंत्रणा गुंतली आहे.