आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MH370 Search Looks For Debris Breakthrough In New Area

MH370: चिनी एअरक्राफ्टला हिंदी महासागरात दिसले तीन संभाव्य अवशेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- मलेशियन एअरलाइन्सचे विमान 'MH370' बेपत्ता होऊन तीन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्याप या विमानाचा शोध लागलेला नाही. एका चिनी एअरक्राफ्टला दक्षिण हिंदी महासागरात तीन संभाव्य अवशेष दिसले आहेत. 'MH370'चे अवशेष असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चीनच्या एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. लाल, पांढरा,आणि नारंगी रंगाचे हे अवशेष आहेत. या पार्श्वभूमीवर चीनने आपली शोधमोहीम अधिक तीव्र केली असून दक्षिण हिंदी महासागरात केंद्रित केली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड एअरफोर्सला देखील हिंदी महासागरात अशा प्रकारचे अनेक संभाव्य अवशेष यापूर्वी दिसले होते.

सॅटेलाइटद्वारा शुक्रवारी प्राप्त झालेल्या छायाचित्रांच्या आधारावर शोधमोहीमेचे क्षेत्र 1,100 किलोमीटर उत्तर-पूर्व निश्चित करण्‍यात आले. दक्षिण हिंदी महासागरात शोधमोहीम 3,19000 वर्ग किलोमीटर क्षेत्रात सुरु आहे. भारतातील राज्याच्या क्षेत्रफळाचा विचार केल्यास मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरातच्या क्षेत्रफळाहून अधिक भागात शोधमोहीम उघडण्यात आली आहे.

दुसरीकडे, चीनमधील विमा कंपन्यांनी प्रवाशांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, निर्धारित वेगा पेक्षा प्रचंड वेगात झेपावत होते MH370