आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mh370 Searchers Detect Promising Acoustic Lead Latest International News In Marathi

बेपत्ता विमान : ब्लॅक बॉक्सशी सुसंगत दोन संदेश मिळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - बेपत्ता मलेशियन विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून निघणार्‍या संदेशाची ओळख पटवण्यात आश्वासक यश मिळाल्याचा दावा ऑस्ट्रेलियन अधिकार्‍यांनी सोमवारी केला. साधारण महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या विमानात 239 प्रवासी होते.
ऑस्ट्रेलियन नौदलाच्या जहाजाला ब्लॅक बॉक्समधील संदेश दोन वेळा मिळाले. यामध्ये हिंदी महासागरामध्ये एकदा ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ मिळाल्याची माहिती संयुक्त शोधमोहिमेचे प्रमुख अंगुस ह्यूस्टन यांनी दिली. आम्हाला दृश्य आणि ध्वनी स्वरूपात संदेश प्राप्त झाले. ध्वनिसंदेश आपत्कालीन लोकेटर बीकॉनसारखा आहे. पहिल्या संदेशाचा कालावधी दोन तासांपेक्षा जास्त तर दुसरा 13 मिनिटांपर्यंत मिळाला. ध्वनिसंदेश 4500 मीटर खोलीतून या सर्व गोष्टी अत्यंत वेगवान पद्धतीने घडल्या नाहीत. शोधमोहिमेतून हा आश्वासक पुरावा मिळाला आहे, असे ह्यूस्टन यांनी सांगितले.