आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशेल ओबामा को भी गुस्सा आता है!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगभरातील महिलांच्या रोलमॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनाही राग येतो. नुसता रागच येत नाही तर रागाच्या भरात त्या एखादी मोहीमच सोडून देण्याची धमकीही देऊन टाकतात. डेमोक्रॅटिक पार्टीच्या निधी संकलन कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना महिला आणि पुरुष समलैंगिकांना समान अधिकार देण्याची वारंवार मागणी करून त्यांच्या भाषणात एका आंदोलकाने अडथळे आणले. त्यामुळे मिशेल संतापल्या आणि हा कार्यक्रमच सोडून जाण्याची धमकी त्यांनी दिली.

वॉशिंग्टनमधील कॅलोरामा होममध्ये डेमॉक्रेटिक पार्टीच्या निधी संकलन कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू होताच पुढच्या रांगेत उभा राहून एका कार्यकर्त्याने पुरुष समलैंगिकांना समान अधिकार देण्याच्या मागणीच्या घोषणा दिल्या. ‘ज्या गोष्टी मी करू शकत नाही, ही त्यापैकीच एक आहे, तुमच्या लक्षात आलंय का?’ असे संतापलेल्या मिशेल म्हणाल्या. ‘एक तर माझे म्हणणे ऐकून घ्या, नाही तर माइक तरी हातात घ्या, मी निघाले. तुम्ही सर्वजण मिळून ठरवा. तुम्हाला दोन्हीपैकी एकाची निवड करायची आहे,’ असेही त्यांनी बजावले. मिशेल यांचे 12 मिनिटांचे भाषण बाकी होते. त्या कार्यकर्त्याला सभागृहाबाहेर काढल्यानंतर त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.