आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपूर पाणी प्या, निरोगी राहा : मिशेल ओबामांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- निरोगी जीवनासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला साक्षात अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने नागरिकांना दिला आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित ‘ड्रिंक अप’ कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी अमेरिकनांना असे आवाहन केले आहे. ड्रिंक अप या मोहिमेची संकल्पना मिशेल यांचीच असून या मोहिमेत 60 विविध संघटनांनी सहभाग घेतला आहे. ही मोहीम सुरू करण्याच्या एक वर्षाच्या आतच पाण्याच्या बॉटल्सची विक्री आणि पाणी पिणार्‍यांच्या संख्येतही 3 टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सकस आहाराचा योग्य रितीने प्रचार केल्यास लहान मुलांचा त्या पदार्थांकडे कल वाढतो व कुटुंबांना त्यांची खरेदी करणे भाग पडते, असे मत मिशेल यांनी व्यक्त केले. पाण्यासारख्या उत्पादनाच्या विक्रीसाठी विपणन तंत्र वापरल्यास जर इतका प्रभाव पडू शकतो, तर धान्य, फळे, भाजीपाला, सकस मांस, दुग्धजन्य पदार्थ खाण्यासही लहान मुलांना प्रोत्साहित केले जाऊ शकते. 90 टक्के शाळांमध्ये आज मुलांना पौष्टिक जेवण दिले जात असल्याचे मिशेल म्हणाल्या. मुलांतील लठ्ठपणा कमी करण्यासाठी मिशेल यांनी 2010 मध्ये ‘लेट्स मूव्ह’ नावाची मोहीम सुरू केली आहे.