आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Obama Birthday And Barack Obama Us President

रागट असल्याची टीका झालेल्या मिशेल ओबामा आहेत दिलखुलास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात शक्तीशाली नेते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल इतर देशांच्या नेत्यांच्या पत्नीपेक्षा काकणभर जास्त क्रियाशील आहेत. त्यांच्यातील दिलखुलासपणाची झलक त्या ओबामांसोबत भारत दौ-यावर आल्या तेव्हा सा-या जगाने पाहिली होती. मुंबईत शाळकरी मुलांसोबत कोळी गितावर त्यांनी धरलेला ताल कित्येक दिवस आंतरराष्ट्रीय मिडियामध्ये दाखविला गेला.

१७ जानेवारी १९६४ ला शिकागो येथे जन्मलेल्या मिशेल लॉवॉन रॉबिन्सन १९९२ साली बराक ओबामा यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या.

चार वर्षांपूर्वी ओबामा जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा जेवढे लक्ष ओबामांकडे होते, तेवढीच प्रसिद्धी मिशेल यांना देखील मिळाली होती. आज त्यांना उगवता तारा मानले जात आहे. २००८ साली जेव्हा ओबामांचा निवडणूक प्रचार सुरु होता तेव्हा, टीकाकारांनी मिशेल रागट असल्याचे म्हटले होते.