आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HAPPY B'DAY मिशेल: आयुष्याच्या 50 व्या वर्षी पतीकडून मिळाले त्रासदायक गिफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या पहिला महिला मिशेल ओबामा यांनी आज 50 व्या वर्षात पर्दापण केले. परंतु, यंदाचा वाढदिवस त्यांच्यासाठी दुःखदायी आणि त्रासदायक असल्याचे दिसून येते. त्यांचे पती आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीच त्यांना असे त्रासदायक गिफ्ट दिले आहे.
बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्यामध्ये दूरावा आला असून दोघे घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त इन्क्वायरर या वेबसाईटने नुकतेच दिले होते. बराक ओबामा यांच्या बदललेल्या स्वभावामुळे मिशेल घटस्फोट घेणार असल्याचे समजते. परंतु, 2016 पर्यंत अध्यक्षपदावर असेपर्यंत घटस्फोट न घेता व्हाईट हाऊसमध्येच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. यावरून दोघांमध्ये असलेल्या भांडणाचे उग्र स्वरूप दिसून येते.
मिशेल यांचा जन्म 17 जानेवारी 1964 रोजी शिकागोत झाला. त्यांचे नाव मिशेल लावॉन रॉबिन्सन आहे. त्यांनी 1992 मध्ये बराक ओबामा यांच्याशी लग्न केले. बराक ओबामा अध्यक्ष झाल्यानंतर जेवढी बराक यांची चर्चा झाली तेवढीच मिशेल यांचीही झाली. बराक ओबामा यांच्या अनेक विदेश दौऱ्यांमध्ये मिशेल सहभागी झाल्या होत्या. बराक यांच्यासोबत त्या भारतातही आल्या होत्या. यावेळी त्यांनी मुंबईत मराठी शाळेच्या मुलींसोबत कोळी नृत्य करून जगभरातील माध्यमांचे मथळे गाठले होते.
पुढील स्लाईड्सवर वाचा कसा आहे मिशेल यांचा स्वभाव...