आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Obama Dress At The Inauguration Ball 2013

PHOTOS : रेड गाऊनमध्ये दोन बायबल घेऊन उभ्या होत्या मिशेल ओबामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा यांनी सोमवारी चौथ्यांदा शपथ घेतली. याआधी रविवारी त्यांनी शपथ घेतली होती. सुटी असल्याने सोमवारी सार्वजनिक समारंभात शपथविधी झाला. 2009 मध्ये राष्‍ट्रपती झाल्यानंतर शपथ घेताना चूक झाली होती. त्यामुळे ओबामा यांना दोनदा शपथ घ्यावी लागली होती. कॅपिटल हिल्समध्ये झालेल्या सोहळ्याला 10 लाख लोकांची उपस्थिती होती. गेल्या वेळी 18 लाख लोक होते. ओबामा यांना सरन्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट्स यांनी शपथ दिली आणि न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी उपराष्‍ट्र पती जो बायडेन यांना शपथ दिली.

रुझवेल्ट यांनी 4 वेळा घेतली होती शपथ : फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्यानंतर ओबामा हे चार वेळा शपथ घेणारे राष्‍ट्र पती ठरले आहेत. अर्थात रुझवेल्ट यांनी 1932, 1936, 1940 आणि 1944 मध्ये राष्‍ट्र पती झाल्यामुळे चार वेळा शपथ घेतली होती.