अॅसिड हल्ले थाबंवण्यासाठी काम करणा-या भारतीय लक्ष्मीला अमेरिकी सरकारचा वुमन ऑफ करेज अवॉर्ड मिळाला आहे. अमेकिचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशल ओबामा यांच्याहस्ते लक्ष्मीला हा पुरस्कार मिळाला आहे. मिशल यांनी लक्ष्मीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. हा सोहळा 4 मार्चला संपन्न झाला. भारतीय प्रमाणवेळेनूसार रात्री 10 वाजता या कार्यक्रमाला सुरवात झाली. लक्ष्मीसोबतच विविध देशातील नऊ महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लक्ष्मीच्या या लढाईला दैनिक भास्करने पहिल्यांदा वाचा फोडली होती. लक्ष्मी सात वर्षांपासून सुप्रिम कोर्टात न्यायासाठी लढत होती. गेल्या वर्षी अॅसिड हल्ल्यांला बळी ठरलेल्या लक्ष्मीसारख्या महिलांच्या बाजूने दैनिक भास्करने एक अभियान चालवले होते.
2005 मध्ये लक्ष्मी 16 वर्षांची असताना तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. या सोहळ्यात लक्ष्मीने अॅसिड अॅटॅक पिडीतांवर लिहिलेली कविताही वाचून दाखवली. माझे काम मिशल ओबांना महित असल्याने मी आनंदी आहे. असे लक्ष्मीने पुरस्कार स्वीकार केल्यावर सांगितले. महिल्यांचे अधिकार, समानता आणि सामाजिक विकासासाठी काम करणा-या जगभरातील महिलांना इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज अवॉर्ड दिला जातो.
अॅसिड अॅटॅकमधील महिला सहजासजी सामान्य जीवन जगू शकत नाहीत. त्यांना शाळा,कॉलेज सोडून द्यावे लागते. काहीजणी तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मात्र लक्ष्मीने असे काहीही केले नाही याउलट तिने समाजाचा सामना केला. असे उदगार अमेरिकन परराष्ट्रीय विभागाने लक्ष्मी विषयी बोलताना काढले आहेत. गेल्या वर्षी भास्करच्या मोहिमेनंतर लक्ष्मी स्टॉप अॅसिड अॅटॅक अभियानाशी जोडली गेली. तिच्या अर्जानंतर सुप्रीम कोर्टोने अॅसिड विक्रीच्या नियमात बदल केले होते.
लक्ष्मीने मिशल ओबामा यांना वाचून दाखवलेली कविता वाचा पुढील स्लाइडवर...