आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Obama Not Look Impressed At Saudi Arabia Trip

मिशेल यांच्या श्रद्धांजलीवरून सौदीमध्ये वादंग, हेडस्कार्फ न घातल्यामुळे आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत दौ-यातील आग्रा भेट वगळून रवाना झालेले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा व मिशेल यांना सौदी अरेबियात वादंगाला सामोरे जावे लागले. किंग अब्दुल्ला यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात हेडस्कार्फ परिधान न करता सहभागी झाल्यावरून मिशेल यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.
यू-ट्यूबवर सौदीच्या सरकारी टीव्हीचा हवाला देऊन एक व्हिडिआे जारी झाला होता. त्यात फर्स्ट लेडी मिशेल यांनी हेडस्कार्फ घातला नसल्याचा दावा करण्यात आला. तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यानंतर आेबामा दांपत्य मंगळवारी रियाधमध्ये दाखल झाले. त्यांचे विमान येथे पोहोचल्याच्या काही तासांनंतर मिशेल यांनी पँट, चमकदार जॅकेट घालून श्रद्धांजली कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र, हेडस्कार्फ नव्हता. त्याला अरेबियन भाषेत निकाब असे म्हटले जाते. सौदीमध्ये महिलांसाठी निकाब घालण्याची परंपरा आहे. त्यात डोके आणि चेहरा झाकून घेतला जातो. त्या अगोदर सौदी अरेबियाच्या शिष्टमंडळाने राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. काहींनी मिशेल यांच्याशी हस्तांदोलन केले. काहींनी त्यांचा पेहराव पाहिल्यानंतर मात्र हस्तांदोलन करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. िट्वट तसेच सोशल मीडियातून मिशेल यांच्या पेहरावाबद्दल टीकेची झोड उठली. दरम्यान, मंगळवारी सौदीचे नवे राजे सलमान यांनी विमानतळावर राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. त्या वेळी रेड कार्पेट अंथरण्यात आली होती. त्याचबरोबर लष्करी बँड व सौदीच्या राष्ट्रगीताचेदेखील गायन झाले.
कायदा काय म्हणतो ?
सौदी अरेबियाच्या राजेशाही पद्धतीमध्ये महिलांच्या पेहरावाबद्दल अनेक नियम सांगण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठी महिलांवर अनेक प्रकारची बंधने आहेत; परंतु परदेशी महिलांना त्यातून वगळण्यात आले आहे.
सौदीच्या राजदूतांनी आरोप फेटाळला
फर्स्ट लेडी मिशेल यांच्या श्रद्धांजलीवरून निर्माण झालेला वाद बिनबुडाचा असल्याचे सौदी अरेबियाच्या अमेरिकेतील राजदूत कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. अगोदर वास्तव जाणून घेतले पाहिजे. वास्तव केवळ फेसबुक पाहून स्पष्ट होऊ शकत नाहीत, असे सौदी राजदूत कार्यालयाने टि्वट करून सांगितले.
पुढील स्‍लाईडवर वाचा इसिसविरूद्धच्‍या लढ्याविषयी...