आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Obama Not Look Impressed At Saudi Arabia Trip

PHOTOS: सौदी अरेबियात स्वागत न केल्याने उदास झाल्या मिशेल, पेहेरावही बदलला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया‍चित्र: ओबामा, मिशेल आणि सौदीचे राजे सलमान. रॉयटर्स

रियाध- अमेरिकेच्या फर्स्‍ट लेडी मिशेल ओबामा सौदी अरेबियामध्‍ये स्वागत न केल्याने खूप उदास होत्या. बराक ओबामा आणि मिशेल जेव्हा मंगळवारी(ता.27) एअरफोर्स वनमधून रियाधमध्‍ये उतरले, तेव्हा सौदीचे नवे राजे सलमान आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले.या घटनेने मिशेल यांचा चेहरा उतरला होता. ओबामांबरोबर असलेल्या वार्ताहरांनी सांगितले,की मिशेलने सौदीतील चालीरिती समजून घेतल्या. त्या ओबामांच्या मागे उभे राहणेच योग्य समजले.
नवी दिल्लीहून रियाधकडे जाताना मिशेल खूप आनंदी होत्या. परंतु काही तासानंतर जेव्हा विमान सौदी अरेबियात उतरल्यानंतर त्या खूप बदललेल्या दिसत होत्या. मिश्‍ोल मिडी किंवा गाऊनऐवजी पायापर्यंत असलेले स्लॅक्स आणि जॅकेट परिधान केलेल्या दिसल्या. बुरखा न घातल्यामुळे मिशेल यांच्यावर मोठ्याप्रमाणावर ट‍ि्वटरवर टीका करण्‍यात आले होते.
असे असताना काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या लोकांमध्‍ये मिशेलने निळे रंगाचे जॅकेट घातलेले दिसत होते. त्यावर ही लोकांनी हरकत नोंदवली. यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्यात ओबामांच्या दौ-याच्या फुटेजमध्‍ये मिशेल यांना अंधुक दाखवण्‍यात आले आहे.मात्र वास्तव व्हिडिओत मिशेल स्पष्‍ट दिसत आहे, असा दावा करण्‍यात आला आहे.

पुढे पाहा सौदी अरेब‍िया दौ-याचे मिशेल आणि ओबामांचे छायाचित्रे...