आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्याने शोधल्या मायक्रोसॉफ्टच्या त्रुटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - संगणकाच्या गेमिंग प्रणालीच्या सुरक्षेतील त्रुटी शोधण्याचे काम एखाद्या लहान मुलाने केले, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल ? परंतु अशी कामगिरी एका पाचवर्षीय मुलाने करून दाखवली आहे. त्याचे संगणक चातुर्य पाहून संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रातील मातब्बर कंपनी मायक्रोसॉफ्टदेखील चकित झाली आहे.
ख्रिस्तोफर व्हॉन हॅसल असे या अवलियाचे नाव आहे. तो मूळचा सॅनदिएगोचा आहे. ख्रिस्तोफर वयाच्या अगदी सुरुवातीपासून कॉम्प्युटर सॅव्ही आहे. संगणकावर खेळत असताना त्याने काही बटणांचा जाणीवपूर्वक वापर केला. त्यानंतर तो सहजपणे विना पासवर्डचा गेमिंग अकाउंटमध्ये प्रवेश करू शकत असल्याचे दिसून आले. ख्रिसमसनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याची करामत लक्षात आली. त्याची करामत हा हॅकिंगचाच एक प्रकार आहे. परंतु लहान वयात संगणकातील चातुर्य पाहून मायक्रोसॉफ्टने त्याला बक्षिसाच्या स्वरूपात शाबासकी दिली नसती तरच नवल. अगोदरही तो एक वर्षाचा असताना अपघाताने सेलफोनशी खेळताना हॅकिंगचा प्रकार घडला होता. त्याने ‘होम’ की दाबून ठेवल्यानंतर फोन बंद झाला होता, अशी आठवण त्याचे वडील रॉबर्ट डेव्हिस यांनी सांगितली.
सुरक्षेबाबत निर्णय घेऊ
आम्ही ग्राहकांच्या तक्रारी नेहमीच ऐकून घेतो. त्याचबरोबर काही समस्या आमच्या लक्षात आणून दिल्या तर त्यांच्याविषयी आम्ही आभार व्यक्त करतो. त्यामुळे आता आम्ही एक्सबॉक्स गेमिंगच्या सुरक्षेबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ. -मायक्रोसॉफ्ट
नेमके काय केले ?
एक्सबॉक्स नावाच्या गेमिंग सिस्टिममध्ये मागील दाराने प्रवेश करण्याची पद्धत ख्रिस्तोफरने शोधून काढली आहे. पासवर्ड व्हेरिफिकेशन स्क्रीनवर जाऊन क्लिक करणे. त्यानंतर स्पेस की ला टाइप करून एंटरच्या की जोरात दाबणे. एवढाच साधा वाटणारा फॉर्म्युला त्याने शोधून काढला.
चार बक्षिसे
मायक्रोसॉफ्टने ख्रिस्तोफरला एक्सबॉक्स लाइव्हचे चार गेम मोफत देण्याचे जाहीर केले असून या गेमचे वर्षभराचे सदस्यत्वदेखील मोफत देण्यात आले आहे.
कशी सुचली कल्पना ?
वडिलांच्या एक्सबॉक्स लाइव्ह अकाउंटला ओपन करण्यासाठी तो खूप झटला. त्या वेळी पासवर्ड लॉग-इन स्क्रीनवर दिसू लागले. त्यावर त्याने चुकीचा पासवर्ड टाइप केला. त्यानंतर ख्रिस्तोफरने केवळ स्पेस बटण दाबून नंतर एंटरचे बटण दाबले. त्याची ही कृती मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग प्रणालीला भेदणारी ठरली.