आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Middle, East Europea In Winter Waves; Four Men Death In Bulgeria

मध्य, पूर्व युरोप थंडीच्या लाटेच्या कचाट्यात; बल्गेरियात चार जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफिया - युरोपचा पूर्व आणि मध्य भाग प्रचंड थंडीच्या लाटेच्या कचाट्यात सापडत चालला असून गेल्या काही दिवसांत बल्गेरियामध्ये या लाटेमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोमध्ये बुधवारची सर्वाधिक गोठलेला दिवस म्हणून नोंद झाली.बल्गेरियामध्ये प्रचंड हिमवादळ आणि बर्फवृष्टीमुळे बाल्कन प्रांतातील शेकडो खेड्यांतील नागरिकांना पाणी आणि वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. बर्फवृष्टी आणि हिमवादळांमुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून दुर्गम भागात खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी मदत आणि बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
भूमध्य हवामानाचा प्रदेश असूनही क्रोएशियातील मध्य अँड्रियाटिक किना-यावर प्रचंड बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शेजारच्या माँटेनिग्रोमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथील रस्तेही बंद करण्यात आले आहेत. बुधवारी मॉस्कोतील तापमान उणे 22 अंशांवर, तर सभोवतालच्या प्रदेशाचे तापमान उणे 33 अंशांवर घसरले आहे. वर्षातील हा सर्वाधिक थंडीचा दिवस ठरला. रोमानियामध्येही बर्फाचे ढिगारेच्या ढिगारे साचल्याने शाळा, रस्ते आणि रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे.