आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Middle East Revealed A Female Perspective News In Marathi

मिडल ईस्टच्या देखण्या महिलांचे शानदार फोटो, न्युयॉर्कमध्ये लागेल प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अ गर्ल बेडरुम सिरीजमधील फोटो)
न्युयॉर्कच्या फोटो प्रदर्शनात पहिल्यांदाच मिडल इस्टच्या महिलांचे महिलांच्या नजरेतून घेतलेले फोटो झळकणार आहेत. यमन, इराण, लेबनान आणि सौदी अरब येथील चार महिला फोटोग्राफर्सची टीम त्यांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवणार आहे.
याला 'द मिडल ईस्ट रिव्हिल्ड: अ फिमेल पर्सपेक्टिव्ह' असे नाव देण्यात आले आहे. यात हज यात्रेपासून एका मुलीच्या बेडरुमपर्यंतच्या छायाचित्रांचा समावेश आहे. हावर्ड ग्रीनबर्ग गॅलरीत हे प्रदर्शन होणार आहे.

बुसरा अलमूतावकेल, शादी घादीरियन, रानिया मतार आणि रीम अल फैसल अशी या महिला छायाचित्रकारांची नावे आहेत. मिडल इस्टमधिल दैनंदिन जीवन छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.
यातील रीम अल फैसल सौदीचे माजी बादशहा फैसल यांची पणती समजली जाते. त्यांना 1994 पासून फोटोग्राफिचा छंद जडला. त्यानंतर त्यांनी इस्लामिक धार्मिक स्थळांची ब्लॅक अॅण्ड व्हाईट शेडमधील अनेक छायाचित्रे काढली.
शादी घादीरियनचा जन्म इराणमध्ये झालेल्या क्रांतीच्या दरम्यानचा आहे. शरिया कायद्यांतर्गत राहून तिने अफलातून छायाचित्रे घेतली आहेत. तिच्या छायाचित्रणात कुटुंब ही मध्यवर्ती भूमिका असल्याचे दिसून येते.
बुसरा अलमूतावकेल यमनची पहिली महिला फोटोग्राफर आहे. महिलांचे डॉमिनेटिंग पोस्टर आणि जेस्चर यावर फोकस करून ती फोटोग्राफी करते.
रानिया मतारचा जन्म लेबनानमध्ये झाला. परंतु, सध्या ती अमेरिकेत राहते. किशोरवयीन आणि बालवयातील मुलींचे फोटो काढण्यावर तिचा भर असतो.
पुढील स्लाईडवर बघा या चार महिला छायाचित्रकारांनी काढलेले फोटो