आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीही पास नव्हते एके-47 चे जनक मिखाईल, वाचा रंजक इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील शस्त्रांमध्ये सरस ठरलेल्या एके-47 चे जनक मिखाईल कालाश्निकोव्ह यांचे जीवन अत्यंत रंजक राहिले. सायबेरीयाच्या एका गावात जन्मलेले मिखाईल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले नव्हते. परंतु, आपल्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी सोव्हिएत युनियनच्या रणगाडा रेजिमेंटमध्ये मेकॅनिक म्हणून स्थान मिळविले. तेथूनच सुरू झाली एके-47 ची कहानी...
नाझी साम्राज्यामुळे तयारी केली एके-47
नाझी साम्राज्यामुळे मी रायफल डिझायनर झालो असे मिखाईल सांगतात. 1941 मध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांनी या रायफलच्या डिझाईनवर विचार करण्यास सुरवात केली. त्यांना वजनाने हलकी, स्वस्त आणि कोणत्याही परिस्थितीत हाताळता येईल अशी रायफल शोधून काढायाची होती.
यापेक्षा गवत कापण्याची मशिन तयार करायला हवी होती -मिखाईल
मी देशाचे रक्षण करण्यासाठी एके-47 रायफल तयार केली होती. परंतु, ही रायफल दहशतवाद्यांच्या हातात बघितल्यावर यापेक्षा गवत कापण्याचे यंत्र शोधून काढले असते तर बरे झाले असते असे वाटते, असे मिखाईल सांगतात.
वजन आणि गंजावर विशेष लक्ष
एके-47 रायफल वजनाने हलकी राहावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या रायफलचे वजन केवळ चार किलोग्रॅम आहे. याला गंज लागू नये म्हणून त्यावर फॉस्फोरस लावण्यात आला आहे. गोळ्या असलेल्या चेंबरमध्ये क्रोम कोटिंग करण्यात आले आहे.
एके-47 ची वैशिष्टे वाचा पुढील स्लाईडवर