आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Military Come Into Power In Egypt Through Democracy Way

इजिप्तमध्ये लोकशाही मार्गाने लष्कर सत्तेवर येणार, लष्‍करप्रमुख सिसी लढवणार निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - लोकशाही मार्गाने निवडून येणारे पहिले राष्ट्राध्यक्ष मुर्सी यांना हटवणा-या लष्करप्रमुख अब्देल फतेह अल सिसी यांनी निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. जनतेच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इजिप्तमध्ये लोकशाही मार्गाने लष्कर सत्तेवर येण्याच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
जनतेची मागणी मी फेटाळून लावणार नाही. लोकांच्या स्वप्नांशी आपण खेळू शकत नाहीत. आमच्याकडे जादूची कांडी आहे, असे आपण त्यांना सांगू शकत नाहीत. चला, आपण सर्व मिळून नऊ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा विकास घडवूया, असे आवाहन सिसी यांनी केले. कुवैतच्या अल सैयासा या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी जनतेला ग्वाही दिली.