(फाइल फोटो: इस्लामिक स्टेटचे आत्मघातकी हल्लेखोर)लंडन- पाश्चिमात्य देशांमध्ये दहशत पसरवणारे ISIS चे (इस्लामिक स्टेट) दहशतवादी आता जैविक शस्त्राचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. ब्रिटनमधील वेबसाइट 'डेलीमेल'ने लष्कराच्या विशेषज्ज्ञांच्या हवाल्याने हा खुलासा केला आहे.
ISISचे दहशत आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत असून, ते हल्ल्यासाठी 'इबोला व्हायरस'चा जैविक अस्त्रासारखा वापर करू शकतात. दहशतवादी 'इबोला'च्या रुग्णांशी संपर्क करून पाश्चिमात्य देशात हा 'इबोला व्हायरस' मोठ्या प्रमाणात संक्रमीत करू शकतात, अशी भीती ब्रिटन लष्कारीत विशेषज्ज्ञांनी वर्तवली आहे.
'इबोला व्हायरस'चा वापर आत्मघातकी हल्ल्यासाठी करणे मोठे धोकादायक ठरू शकते, असे मत अमेरिकेतील नेव्हल वॉर कॉलेजमधील राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्राध्यापक रिटायर्ड कॅप्टन अल शिमकुस यांनी व्यक्त केले आहे. बकिंघम युनिर्व्हसिटीमधील सेंटर फॉर सेक्युरिटी अँड इंटेलिजेंस स्टडीजचे संचालक प्रा. अँथोनी ग्लीज यांच्या मते, ISIS चे दहशतवादी खूप खतरनाक आहेत. ते काहीही करू शकतात. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यांवरच जास्त विश्वास ठेवतात, असे ग्लीज यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आफिकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी 'इबोला व्हायरस'ने हाहाकार उडवून दिला होता. 'इबोला'ने 3,800 लोकांचा बळी घेतला होता. ISIS च्या हलचालींवर गांभिर्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही विशेषज्ज्ञांनी म्हटले आहे.
'इबोला व्हायरस'मुळे मोठी महामारी पसरु शकते. इबोलावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. इबोलाचा आत्मघातकी हल्ल्यासाठी ISIS चे दहशतवादी वापर करू शकतात, असे रॉयल युनाइटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ संशोधक जेनिफर कोल यांनी म्हटले आहे.
"ISIS चे दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यासाठी 'इबोला व्हायरस'चा वापर करू शकतात. कारण पश्चिम आफ्रीकेमध्ये 'इबोला व्हायरस' सहज उपलब्ध होऊ शकतो, असे मत किंग्ज कॉलेज लंडनचे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स स्टडीज सेक्युरिटी एक्सपर्ट एंड्रीयाज क्रेग यांनी मांडेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इराक आणि सीरियातील लेटेस्ट फोटो...