आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MISS UNIVERSEला वादाने प्रारंभ, \'ताज\'साठी 86 देशांच्या सौंदर्यवती स्पर्धेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - यंदाची मिस युनिव्हर्स निवडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये स्पर्धेची अंतिम फेरी 9 नोव्हेंबरला होणार आहे. मॉस्कोच्या वेग्स मॉलमध्ये मंगळवारी या स्पर्धेतील स्पर्धक तरुणी राष्ट्रीय कॉस्चूममध्ये आल्या. यावेळी स्विमसुट राऊंडही झाला.
मिस युनिव्हर्सचे हे 61 वे वर्ष असून रशियामध्ये प्रथमच ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत 86 देशांच्या सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत. स्पर्धा सुरु झाल्याबरोबर त्यासोबतच राजकारण आणि वादही सुरु झाले आहेत. अमेरिकेतील एका आयोजकाने समलैंगिक विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी स्पर्धेत सहभागी होण्याला विरोध केला आहे. तर, स्पर्धेचे मालक डोनल्ड ट्रॅम्प यांनी अमेरिकेची गु्प्त माहिती लिक करणा-या एडवर्ड स्नोडेनला स्पर्धेत बंदी घातली आहे. स्नोडेनने सध्या रशियामध्ये शरण घेतलेली आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी पार पडली. यावेळी स्पर्धक सौंदर्यवती कॅटवॉक करताना दिसल्या. स्टेजवर आल्यानंतर स्पर्धकांना फक्त स्वतःचे नाव आणि देशाचे नाव सांगायचे होते. रशियाची स्पर्धक जेव्हा मंचावर आली तेव्हा हॉलमधील सर्व फॅन्सनी तिचे जोरदार स्वागत केले.