आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 सौंदर्यवतींना मागे टाकून देखणी, तेवढीच बालिश चेहऱ्याची मेगान झाली मिस वर्ल्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाली (इंडोनेशिया)- नवीन मिस वर्ल्डचे सिलेक्शन करण्यात आले आहे. यावेळी विश्वसुंदरीचा ताज फिलिपिन्सची मेगन यंग हिने पटकाविला आहे. पहिल्यांदाच फिलिपिन्सला हा मान मिळाला आहे. 130 सौंदर्यवतींना मागे टाकून 23 वर्षीय मेगनने हा ताज आपल्या नावावर केला आहे. मेगन सध्या फिल्म मेकिंगचा कोर्स करीत आहे. अमेरिकेत जन्मलेली मेगन जेव्हा 10 वर्षांची होती तेव्हा तिचे कुटुंब फिलिपिन्स येथे शिफ्ट झाले होते. मेगनच्या पाठोपाठ फ्रान्सची मेरिन लॉरफेलिन फस्ट रनर अप आणि घानाची ना-ओकाइली सेकेंड रनर अप राहिली आहे.

भारताची नवनित कौर टॉप टेनमध्येही नाही
भारताची नवनित कौर टॉप टेनमध्येही येऊ शकली नाही. तिला मिस मल्टिमिडियाचा किताब मिळाला आहे. 2000 मध्ये प्रियांका चोप्राने भारताकडून मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

मिस वर्ल्ड सोहळ्याचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...