आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss World Chiefs Cancel Bikini Round To Avoid Offending Muslims

यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत \'नो बिकिनी\'; इस्लामिक कट्टरवाद्यांची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस वर्ल्ड स्पर्धेची प्रतिक्षा करीत असलेल्या लोकांची यंदा थोडीशी निराशा होण्याची शक्यता आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात जगातील सर्वात सुंदर महिला निवडण्याची स्पर्धा होत असून जगभरातील महिला आपले सौंदर्याचा जलवा दाखवतील. मात्र यंदा प्रथमच या ललनांना बिकिनी राऊंड करावा लागणार नाही. मात्र हा राऊंड लोकप्रिय व खूपच ग्लॅमर मिळवून देणारा असतो. मात्र स्पर्धेत सहभागी होणा-या मुली व मॉडेल आपल्या शरीराचे उदात्तकरण करतात म्हणून बिकिनी राऊंडवर टीका होत होती. त्यामुळेच विरोध झाल्याने हा राऊंड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी आयोजित केला जाणारी मिस वर्ल्ड या स्पर्धेत शेकडो देशातील सुंदर मुली आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. या वर्षी ही स्पर्धा इंडोनेशियातील बाली द्वीपसमूहावर होत आहे. इंडोनेशिया हा एक इस्लामिक देश आहे. तेथील कट्टरवादी लोकांच्या विरोधामुळे व भीतीमुळे यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संयोजिकांनी बिकिनी राऊंडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत 137 देशांच्या स्पर्धक सहभागी होणार आहेत. मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात 1950 मध्ये झाली होती. पहिल्या विजेती सुंदरीने टू-पीस बाथिंग सूट घालत विजयी ताज घातला होता. आता मात्र सर्वप्रथम मिस वल्र्ड स्पर्धेत बिकिनीशिवाय राऊंड पार पडतील व त्याची कमी जाणवेल.

पुढे वाचा संयोजकांनी अशी भूमिका का घेतली, क्लिक करा....