क्वालालंपूर - सहा महिन्यांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले मलेशिया विमानसेवेच्या एमएच ३७० या विमानाचे रहस्य अद्यापही उलगडले नाही. जागतिक विमान उड्डयण क्षेत्रातील ही अत्यंत रहस्यमयी अशी घटना मानली जाते. ऑस्ट्रेलियन सरकारने या विमानाच्या तपासासाठी लाखो डॉलर्स खर्च करून शोधमोहीम हाती घेतली आहे.
महासागराच्या सुमारे १८०० किलोमीटर परिसरात आता या विमानाचा शोध घेतला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी काल सांगितले की, दोन आठवड्यांसाठी ही नवी मोहीम राबवली जाईल. सोलार सर्व्हेक्षण तंत्रज्ञान प्रणालीवर आधारित ही शोधमोहीम अहोरात्र सुरू राहील. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान वारेन ट्रस यांनी गेल्या महनि्यात या मोहिमेची माहिती दिली होती.
तेव्हा ते म्हणाले की, आता या विमानाचा शोध हिंदी महासागराच्या दक्षणि भागात घेतला जाईल. कारण नव्या तथ्यानुसार हे विमान हिंदी महासागरावरून उडत असताना दक्षिणेकडे वळले होते. ८ मार्च रोजी मलेशियाचे एमएच ३७० हे विमान २३९ प्रवाशांसह क्वालालंपूरहून बीजिंगसाठी झेपावले होते. मात्र, त्यानंतर ते अचानकपणे बेपत्ता झाले.