आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Malaysian MH370, Australia Widens Search Area

बेपत्ता MH370 चा ढिगारा आढळल्याचा मलेशियाच्या मंत्री महोदयांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर- मलेशियाचे बेपत्ता विमानाबाबत गूढ कायम असताना एक ढिगारा आढळून आल्याचा दावा एका मंत्र्यांनी केला आहे. चीनच्या एका उपग्रहाद्वारे दक्षिण समुद्रात तरंगणारी वस्तू टिपली आहे. ही वस्तू म्हणजेच गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेले विमान असल्याचे मंत्री महोदयांनी म्हटले आहे. मलेशियात शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

चीनी अधिकार्‍यांनी उपग्रहाच्या मदतीने दक्षिण कॉरीडोरमध्ये समुद्रावर तरंगणार्‍या वस्तूची छायाचित्रे प्राप्त केली आहे. ही वस्तू म्हणजे बेपत्ता झालेल्या विमानाचा ढिगारा असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विमानाचे अवशेष आढळून आले होते. परंतु, चौकशीत ते विमानाचे अवशेष नसल्याचे सिद्ध झाले होते.

चीनी उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रानुसार ढिगार्‍याचा आकार 20x30 मीटर आहे. मात्र, मलेशियन सरकारच्या माहितीनुसार 22x13 मीटर एवढा आहे. चीनी उपग्रहाने हे छायाचित्र कोणत्या ठिकाणाहून काढले असल्याचे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दक्षिण कॉरीडोरमध्ये हा ढिगारा तरंगत असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, बेपत्ता विमानाच्या शोध मोहिमेबाबतची माहिती..