आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Malaysian Plane News In Marathi, Hindi Ocean, Chinese Embassy

बेपत्ता मलेशियन विमानाच्या अवशेषाचे नवे छायाचित्र आढळल्याचे चीनकडून दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या उपग्रहाने शनिवारी टिपलेले संभाव्य अवशेषासंबंधीचे छायाचित्र. - Divya Marathi
चीनच्या उपग्रहाने शनिवारी टिपलेले संभाव्य अवशेषासंबंधीचे छायाचित्र.

क्वालालंपूर - हिंदी महासागराच्या दक्षिण सागरी क्षेत्रात मलेशियाच्या बेपत्ता विमानाच्या संभाव्य ढिगा-याचे नवीन फोटो आढळून आले आहेत, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे मलेशियाचा तपास आता तिस-या आठवड्यात पोहोचला आहे.


चिनी राजदूताकडे काही तासांपूर्वीच संभाव्य ढिगा-याचे फोटो उपलब्ध झाले आहेत. ही वस्तू तरंगताना दिसून आली होती. दक्षिणकेडील तपास करणा-या पथकाली ही माहिती हाती लागली आहे, असे संरक्षण आणि वाहतूक मंत्री हिशाम्मुद्दीन हुसैन यांनी स्पष्ट केले आहे. चीनकडून अद्याप ही घोषणा झाली नसली तरी लवकरच ती अपेक्षित आहे. चीनने त्या भागात दोन जहाज पाठवले आहेत. त्या परिसरात तरंगणा-या वस्तूचे परीक्षण करण्याचे काम करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन लष्करी जेटकडून शनिवारी सकाळी तपास संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या पाठोपाठ मलेशियन संरक्षण मंत्र्यांचे हे वक्तव्य जारी झाले आहे. दोन आठवडे पूर्ण होऊनदेखील बेपत्ता विमानाचा तपास लागलेला नाही. त्यामुळे सागरतळाशी शोध घेण्यासाठी विशिष्ट सागरी उपकरणांसाठी अमेरिकेकडे मदत मागण्यात आली.


आकार केवढा ?
हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात 22 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी वस्तू आढळून आली आहे. त्याची नवीन छायाचित्रे चीनने जारी केली आहेत.


नेमकी घटना काय ?
क्वालालंपूर येथून बीजिंगकडे जाणारे मलेशियन एअरलाइन्सचे विमान 8 मार्च रोजी अचानक बेपत्ता झाले. विमानात 239 प्रवासी आहेत. त्यात पाच भारतीय आणि एका भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकाचाही समावेश आहे.