आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Maleysian Plane News In Marathi, Hindi Ocean, Divya Marathi

बेपत्ता मलेशियन विमानाचे गूढ उकलणार, हिंदी महासागरात सापडले ५८ अवशेष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - हिंदी महासागरात बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचा शोध घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एका पथकाला समुद्रात ५८ अवशेष सापडले आहेत. हे कठीण अवशेष नेमके त्याच विमानाचे आहेत का, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

मलेशियाचे परिवहनमंत्री लियोत्वांग लाय यांच्या मते, हे अवशेष नेमके बेपत्ता विमानाचेच आहेत का, या निष्कर्षावर येण्यास थोडा वेळ लागेल. त्याची खातरजमा केली जात आहे. गेल्या मार्चमध्ये बेपत्ता या विमानाचे नेमके काय झाले, हे अजूनही कळू शकलेले नाही. विमानात पाच भारतीयांसह २३९ प्रवासी होते. यात सर्वाधिक १५४ प्रवासी चीनचे होते. एखाद्या बेपत्ता झालेल्या प्रवासी विमानाचे गूढ सहा महिन्यांनंतरही कायम राहण्याची हवाई उड्डाणाच्या इितहासातील ही पहिलीच घटना ठरली.

भारताच्या मार्गावरील मलेशियन विमान अचानक परत फिरवले
मलेशियाहून भारताच्या द‍िशेने झेपावलेले एमएच-१९८ प्रवासी विमानात अचानक बिघाड झाल्याने वैमानिकाने ते परत फिरवून सुरक्षित उतरवले. शनिवारी रात्री १०.२० वाजता क्वालालंपूर विमानतळावरून हैदराबादच्या दशिेने निघालेल्या या विमानाने उड्डाण घेतले. मात्र ऑटोपायलटमध्ये अचानक िबघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने ते तत्काळ परत फिरवले. या बिघाडाचा प्रवाशाच्या सुरक्षिततेवर परिणाम होणार नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मलेशियन एअरलाइन्सला गेल्या वर्षभरात दोन वेळा मोठे हादरे बसले. मार्चमध्ये हिंदी महासागरात अचानक बेपत्ता झालेले एमएच-३७० हे विमान अजूनही सापडलेले नाही. नंतर युक्रेनच्या हद्दीत क्षेपणास्त्रामुळे एक विमान पडले.