आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेपत्ता मलेशियन विमानातील कर्मचार्‍यांना हिपोक्सिया! हिंदी महासागरावरून नियंत्रणरहित स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - मार्च महिन्यापासून रहस्य बनलेल्या मलेशियन विमानाच्या गायब होण्यामागील कारणाचा शोध घेण्यात काही प्रमाणात यश आले आहे. हिंदी महासागरावरून हे विमान जाताना वैमानिकांचा ताबा नव्हता. ते ऑटोमोडवर होते, असा दावा ऑस्ट्रेलियन तपास अधिकार्‍यांनी गुरुवारी केला.

विमान तसेच उपग्रह यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून ऑस्ट्रेलियन तपास अधिकार्‍यांनी हा दावा केला. विमानातून 239 प्रवासी जात होते. क्वालालंपूर ते बीजिंगदरम्यान ते हिंदी महासागरावरून जाताना वैमानिक बेशुद्ध स्थितीत होते. विमान आखून दिलेल्या मार्गावरून जात होते. हे केवळ ऑटोपायलटिंग स्थितीमध्येच शक्य होऊ शकते, अन्यथा विमान दिशाहीन भरकटले असते. त्या वेळी कर्मचार्‍यांना हिपोक्सिया झाला होता. दरम्यान, तपासाचे क्षेत्र हिंदी महासागर एवढे करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाच हजार मीटर खोल सागरात शोध घेण्यात येईल. त्यावर 337 कोटी खर्च अपेक्षित आहे.
काय आहे हिपोक्सिया ?
विमानातील कर्मचार्‍यांना हिपोक्सिया झाला होता असा दावा करण्यात आला आहे. प्राणवायूचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे व्यक्ती अशा स्थितीत जाऊ शकतो. ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नसल्याने वैमानिक तसेच कर्मचार्‍यांना नेहमीचे कामदेखील नीटपणे करता आले नसावे, असा तपास अधिकार्‍यांचा अंदाज आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते तासन्तास अपुर्‍या प्राणवायूच्या स्थितीत वैमानिकांना राहावे लागले, तर ते आत्महत्या करू शकतात किंवा विमानाला धडकवू शकतात.
छायाचित्र : नकाशात दाखवण्यात आलेला हा मार्ग.