आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये चांद्र मोहिमेवरील पुस्तकाचा लिलाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अंतराळवीर बझ अल्ड्रीनच्या ‘काँटॅक्ट लाइट ’ या चंद्रावरील मोहिमेविषयीचे पुस्तक लिलावात मांडण्यात येणार आहे. अपोलोच्या 11 अंतराळवीरांनी या मार्गदर्शिकेचा वापर केला होता. 1969 च्या मोहिमेची इत्थंभूत माहिती त्यात वाचायला मिळते. चंद्रावर जाण्यासाठी आवश्यक असणार्‍या सूचना त्यात अल्ड्रीन यांनी दिल्या आहेत. या पुस्तिकेव्यतिरिक्त अल्ड्रीनने चांद्र मोहिमेतील काही चादरींचाही लिलाव करणार आहे. त्याला 60 हजार पाउंड्सची बोली मिळण्याची शक्यता आहे. हा लिलाव 25 मार्चला न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. चंद्रावर पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक मिनिटाचा हिशेब त्यात मांडण्यात आला आहे.